Skip to main content

Posts

Showing posts with the label night trek

पहिली ट्रेक - भीमाशंकर हिल्स

लिखाणाचा हा माझा पहिलाच प्रयत्न असल्याने मी आधीच होणाऱ्या चुकांबद्दल माफी मागतो. तसा मी गिर्यारोहण या विषयामध्ये अजूनही नवीनच आहे. कधीही न ऐकलेल्या आणि पाहिलेल्या घाटवाटा आणि त्यांचं वर्णन वाचताना फारच मजा येते. ते लेख वाचताना आपण जणू काही तिथेच आहोत असा भास मला नेहमी होतो. या घाट वाटा कारण्याचा योग कधी येईल कोण जाणे. पण आयुष्यात एकदा तरी स्वतःला वेळ देऊन अशी ठिकाण आपण केलीच पाहिजेत असा मला वाटतं. जेमतेम ४-५ गड किल्ले आणि घाटवाटा करण्यापर्यंतच माझी मजल गेली आहे. सगळ्यात पहिली ट्रेक मी केली ती म्हणजे भीमाशंकर, जिथे मी आजहि दरवर्षी श्रावणात जातो. भीमाशंकरला निसर्गाचा वरदहस्त आहे असाच म्हणायला पाहिजे. पावसाळ्यात इथल्या काड्यांवरून कोसळणाऱ्या धबधब्यांचे दृश्य जबरदस्त असते. जिकडे पाहावे तिकडे गर्द हिरवळ. पावसाळ्यात इथला निसर्ग आपल्या सौंदर्याच्या सर्वोच्च शिखरावर असतो. कधीकाळी माझ्या मित्रांसोबत कुठेतरी भटकत असताना भीमाशंकर बद्दल ऐकले होते. तेव्हाच तिथे एकदातरी जाऊन येईन असं ठरवलं. तसा मित्रांसोबत प्लॅन ठरला. १५ ऑगस्ट २००९ च्या दिवशी आम्ही भीमाशंकर ला जायचं ठरवलं. आधी कधीच अशा ठिका...