Skip to main content

Posts

कोंडाणे ते राजमाची: उन्हाळ्यातील एक अविस्मरणीय भटकंती

  खूप दिवसांपासून एखादा ट्रेक करण्याचा विचार मनात घोळत होता. पण प्रत्येक वेळी काही ना काही कारण आडवे येत होते आणि ट्रेकचा बेत पुढे ढकलला जात होता. त्यातच महाराष्ट्रात सध्या प्रचंड उष्णतेची लाट सुरू असल्यामुळे उन्हाळ्यात ट्रेक करायचा की नाही याबाबत मनात थोडी भीतीही होती. कडक ऊन, उष्माघाताचा धोका आणि शरीराची होणारी दमछाक यामुळे ट्रेकिंगपासून दूर राहण्याचाच विचार सुरू होता.  तरीही यावेळी शनिवार-रविवार वाया जाऊ द्यायचा नाही, असे ठरवले. काहीतरी नवीन अनुभव घ्यायचा आणि पुन्हा एकदा सह्याद्रीच्या सान्निध्यात वेळ घालवायचा हा निर्धार केला. इंटरनेटवर थोडे संशोधन केल्यानंतर कर्जतजवळील कोंडाणे बौद्ध लेण्यांमार्गे राजमाची किल्ला ट्रेक करण्याचा निर्णय घेतला. पनवेल पासून जवळच असल्याने मला हा ट्रेक सोयीचा वाटला. या ट्रेकसाठी अनेक मित्रांना विचारणा केली. मात्र प्रचंड उकाड्यामुळे कोणीही तयार नव्हते. फेसबुक आणि इन्स्टाग्रामवरही काही पोस्ट करून ट्रेकसाठी सोबती शोधण्याचा प्रयत्न केला. सुरुवातीला काही जणांनी उत्सुकता दाखवली, पण ट्रेकच्या आदल्या दिवशी किंवा शेवटच्या क्षणी सर्वांनी माघार घेतली. अखेरीस ...

छोटेखानी भटकंती - कर्नाळा पक्षी अभयारण्य - कर्नाळा किल्ला

बघता बघता २०१९ चे वर्ष पण संपत आले. ऑफिस मध्ये अचानक जाहीर केलेल्या सुट्टी मुळे धड काही फिरण्याचा प्लॅन होऊ शकला नाही. मग काय शेवटी बायकोच्या आग्रहा मुळे सासूरवडीतच जाऊन येऊ असं ठरलं. सासुरवाडी पण कुठे तर पनवेल. म्हटलं चला वर्षाच्या शेवटी सासुरवाडीचाच पाहुणचार घेऊन येऊ. तसेपण सासरी जावई गेला म्हणजे जावयाचे थाट असतात. निदान माझे तरी आहेच म्हणा. असो, तो फार वेगळा विषय. पण नुसतं एका जागी बसून अराम करणं म्हणजे निव्वळ वेळ फुकट घालवणे असं माझं मत आहे. कुठेतरी सहज भटकून यायचंच असं मी तरी निश्चित केलं. ट्रेकिंगला जायचं म्हटलं तर बायको सोबत असल्याने कुठे जाऊ शकत नव्हतो. तिला या सगळ्या बद्द्दल प्रचंड राग. कदाचित रोज येत असणाऱ्या अपघाती बातम्यांमुळे तिच्या मनात गिर्यारोहणाबद्दल भीती निर्माण झाली असावी. त्यात तिचा दोष नाही म्हणा. इतक्या कमी वेळात माथेरान किंवा लोणावळा यासारख्या ठिकाणी हॉटेल मध्ये बुकिंग सुद्धा मिळणं खूपच अवघड. तस पाहिलं तर पनवेल वरून लोणावळा दोन तासांचं अंतर आहे आणि एका दिवसात जाऊन येऊन होण्यासारखा प्लॅन आहे. पण शेवटी म्हटलं "लोणावळा काय कधीपण जाऊन येता य...

अविस्मरणीय दौंड्या / देवदांडा डोंगर

घरातून ट्रेकिंग ला सतत विरोध होत असल्याने जास्त ट्रेक होत नाहीत. त्यात मी एकुलता एक, मला काही होऊ नये हि घरच्यांची काळजी. ती काळजी रास्तच आहे म्हणा. पण मी कसला ऐकतोय दोन तीन महिन्यातून एखादा ट्रेक तरी मी करणारच. सह्याद्री ची ओढच म्हणा कि ज्यामुळे मला सारखं त्याच्याकडे जावंसं वाटतं. त्याच्या कुशीत एक झोप काढल्याशिवाय कुठल्या सह्याद्री वेड्याला रिलॅक्स वाटणारच नाही. गोरखगड चा ट्रेक झाल्यानंतर परत ओढ लागली ती येणाऱ्या ट्रेकिंग सीजन ची. आकाश तर नेहमी रेड़ीच असतो  त्याचा फोन आला आला कि समजायचं कि ट्रेक प्लॅन रेडी आहे बॅग तयार ठेवा. शुक्रवार चा दिवस होता, शनिवार रविवार काय करायचे याच्याच विचारात होतो. ऑफिसच्या मित्रांसोबत सिनेमा वैगेरे चा प्लॅन होता पण मनापासून जावेसे वाटतच नव्हते. तसा त्यादिवशी दुपारी लंच टेबल वर आकाश चा कॉल आला. आकाश ने सांगितले कि कॅम्पिंग चा प्लॅन आहे शनिवार रविवार मस्त कॅम्पिंग करू. लागलीच  ऑफिस च्या मित्रांना सॉरी बोलून टाकले. आता घरातून परवानगी मिळवण्यासाठी आई चे दोन शब्द ऐकायचे बाकी होते. एक तास आई चे भाषण ऐकल्यावर तिनेच ट्रेक साठी लागणारी शिदोरी बांध...

जबरदस्त गोरखगड ट्रेक

ऑगस्ट महिना संपत आला होता , पूर्णपणे पाऊस संपायचा आत कुठल्यातरी जबरदस्त ट्रेक ला जाऊन यायचे असे वाटत होते. माझा मित्र आकाश,  ज्याच्यासोबत  मी नेहमी ट्रेक ला जातो, त्यानेसुद्धा मला सांगून ठेवले होते कि कधीही प्लॅन होईल तू फक्त रेडी राहा. आमच्यासोबत आमचे अजून मित्र ट्रेक साठी रेडी होते. ते पहिल्यांदाच ट्रेक ला येणार होते. खोपोलीहून योगेश सुद्धा जॉईन होणार होता. आकाश ने व्हाट्सअप ग्रुप वैगेरे बनवला. ग्रुप वर बरीच चर्चा रंगली. बहुतेक जणांना कळसुबाई पीक ट्रेक करायचा होता. महाराष्ट्रातील प्रसिद्ध शिखर असल्याने प्रत्येक नवीन ट्रेकर ला आधी आठवतो तो कळसुबाई. पण शेवटी आकाश आमचा ग्रुप लीडर असल्याने तो जिथे सांगेल तिथे जाणे भाग होते. योगेश आणि आकाश च्या शब्दाबाहेर जाण्याचा प्रश्नच उठत नाही . शेवटी आकाश ने मुरबाड मधील गोरखगड चा प्लॅन निवडला. योगेश आणि आकाश एक दोनदा गोरखगड ला जाऊन आले होते त्यामुळे आम्हाला पूर्ण गायडन्स मिळणार हि खात्री होती. ऑगस्ट महिन्याचा शेवटचा शनिवार आणि रविवार जायचे असे सर्वानुमते ठरले. सुरुवातीला १५ जणांचा ग्रुप आता ६-७ जणांचा राहिला. हे तर नेहमीचाच. गोरखगड...